बी.एस.सी. ची परीक्षा झाली, शेवटचा पेपर संपला तोच आनंदाच्या भरात हॉस्टेल ला आली व फ्रेश होऊन थेट राधा च्या रूम मध्ये गेली..राणी तिथे माझ्या आधीच हजार झाली होती.राधा आणि राणी ह्या माझ्या हॉस्टेल च्या घनिष्ट मैत्रिणी.आमच्या तिघिंच्या रूम वेगवेगळ्या होत्या.तरी तिन्ही रूम वर आमचा समान हक्क होता. आमचा venue ह्या तीन रूम भोवती फिरत राहायचा.म्हणजे आम्हाला शोधणे सोपे होते.एक जण जिथे तिथेच तिघीही.असे गणित हॉस्टेल च्य इतर मैत्रिणींनी मांडले होते.आज राधा च्या रूमचा नंबर होता.त्यामुळे गरम गरम चहाचा कप राणीला व मला हातात भेटला.चहा टोस्ट सोबत गप्पा म्हणजे मज्जाच मज्जा.गोष्टी रंगात आल्या होत्या,तोच बोलता बोलता सहज नजर तिच्या रूम मध्ये असलेल्या गोदरेजच्या जुन्या कपाटाच्या आरशाकडे वळली.पाहून थोडी अस्वस्थ झाले.म्हणून जवळ जाऊन निरखून बघितले.परीक्षेच्या काळात बसून बसून वाढलेले वजन नजरेतन सुटणार कसे?
आता मात्र वातावरणातील मजा जाऊन चिंतेने शिरकाव केला व अखेर दीर्घ चींतनानंतर जिम लावायचा निर्णय घेतला.त्याचदिवशी राणी ला सोबत घेऊन जवळच असलेल्या जिम मध्ये गेली.तिथल्या ट्रेनर आमच्या ओळखीच्या होत्या.दुसऱ्या दिवसापासनच जिम जॉईन करण्याचे ठरवले.जिम लावणे म्हणजे फक्त फॅट बर्न करणं नव्हे तर सोबतच डाएट प्लॅन + ड्रेस+ शुस+ Yoga mat+ पाण्याची बॉटल यांची जुळवाजुळव सुरू झाली आणि मस्त उत्साहात मी माझी जीम ची बॅग पॅक केली.
दुसऱ्यादिवशी सकाळी उठून जिमला गेली.गेल्या-गेल्या वजन केले.५० च्या पाढ्यातल्या वजनाने ६० च्या पाढ्यात शिरकाव केला होता.पुन्हा त्याला मूळ पदावर आणायचे, नव्हे थोडे जास्तच कमी करायचे कारण जीम सोडले की वजन वाढते असे ऐकले होते त्याप्रमाणे मनाशी खूणगाठ बांधून मी फार उत्साहात जीम सुरू केली.
मला माझ्या अपेक्षेनुसार प्रोटोकॉल हवा होता ज्यात मला मॅन्युअल जास्त हवे होते म्हणजे मशिन्स चा वापर कमी. त्यानुसार ट्रेनर नी मला काही प्लान सजेस्ट केले त्यातला एक स्वीकारून, मी फक्त ट्रेडमिल वर १०- १५ मिनिट वॉक आणि सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, योगा यावर भर दिला.
अशाप्रकारे पहिला दिवस तर छानच गेला.
पण मला सकाळी ८ ची बॅच भेटली. आधीची बॅच फुल होती. त्यामुळे मला ट्रेनर नी सकाळी ६ वाजता उठून morning walk १/२तास + १५ मि. आराम+ त्यानंतर हलकासा snack नंतर १ तासाची गॅप घेऊन जिम ला येण्यास सांगितले.
सकाळचे रूटीन ठरले.डाएट ठरला. हॉस्टेल ला राहत असल्यामुळे मिळमिळीत च भेटायचं,त्यामुळे वेगळा डायट काय करणार?? फक्त बाहेरचे खाणे, म्हणजे समोसा, कचोरी सारखे पदार्थ बंद झाले.फक्त दोन वेळेसचा टिफीन भेटायचा, त्यातही भात वर्ज्य आणि दोन वेळेस चहा टोस्ट. झालं,मोहीम सुरू...
महिन्याभरात चांगला रिझल्ट दिसून आला म्हणून दुसऱ्या महिन्यात सुद्धा हाच प्लॅन सुरू ठेवला. प्रगती सुरळीत सुरू होती.माझ्या जिम ट्रेनर देखील सतत प्रोत्साहित करत राहायच्याच.तुझा ग्राफ खूप चांगला आहे.त्यामुळे मलाही हळू हळू छान वाटायला लागले होते.अगदी झीरो फिगर नसले तरी एका नियमित आकृतीत बसावं अस प्रत्येक मुलीला वाटतच असतं आणि तब्बेतीच्या दृष्टींनी देखील ते महत्त्वाचाच नाही का??
मग हळूहळू जिद्द देखील वाढू लागली.अवघ्या ३ महिन्यात मी ८ किलो वजन अगदी आरामात कमी केले.माझ्या उंची नुसार वजन यायला २ किलो चा फरक राहिला होता.खरी गम्मत तर आता होती...
आणखी एक महिना गेला दैनंदिनी जशी च्या तशीच.तरीही वजन काही केल्या कमी होई ना. मग जिम ट्रेनर ला माझी अवस्था सांगितली.
त्या म्हणाल्या : गोड बंद कर.
मी: चहा सोडून मी काहीच गोड खात नाही.
त्या: तेच तर मूळ कारण आहे वजन कमी न होण्याचं.
मी: पण ८ किलो कमी झालं तेंव्हा मी चहा घेतच होती.
त्या :जे ओवर वेट होतं ते लवकर कमी झालं.
आता मुळावर घाला घालायचा असेल तर चहा बंद कर. घ्यायचाच राहिला तर 'ग्रीन टी' घे.
पुन्हा उत्साह संचारला .
हे उर्वरित २ किलो तर मी कमी करूनच राहील.
आता हा विषय माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाचा झाला होता कारण त्यानंतर कदाचित माझी गणना ही जाड मुलींमध्ये न होता व्यवस्थित किंवा अवरेज मुलींमध्ये येणार होती.निदान असा माझा तरी समज होता.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 'ग्रीन टी' बनवला.
पहिल्याच घोटाला बाहेर काढावं वाटणारा चहा, मी खूपच चविष्ट म्हणून गिळंकृत केला.
स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी मी माझ्यापुरतं मर्यादित,एक खोटं जग 'false world' ज्याला म्हणू निर्माण केलं.ज्यात मला जे वाटतं तेच घडतंय.असं समजून मी खुश रहायची.कारण खूप कठीण असतं, आपल्या इतक्या वर्षाच्या सवइ बदलण.
"चहा त्याग मोहीम" सुरू. ग्रीन टी घेऊन, ' स्पोर्ट शूज ' वगैरे घालून मी बाहेर फिरायला निघाली.
माझे हॉस्टेल हे लक्ष्मीनगर परिसरात भर वस्तीत होते. समोर मोठ्ठा व्हॉली बॉल ग्राउंड होता.
पहिली प्रदक्षिणा ग्राउंड भोवती मारून नंतर आसपास च्या भागात फिरणे असा माझा नित्य नेम आधीपासनच होता.
मी सकाळी ६ वाजता उठून नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला निघाली.तोच एका सुंदर परिचीत सुगंधाने माझे मन ढवळून निघाले.तो सुगंध पारिजातकाचा नसून, सकाळच्या चहाचा होता, नजर वासाच्या दिशेनी वळायच्या आधीच, शेजारच्या काकूंच्या घरातून, कप बशीचा आवाज आला.ते दोघे घराच्या बाहेरील अंगणातील बंगई वर बसून नेहमीच चहा पीत. कित्येकदा मला बोलवत. हो.(तीन वर्षे त्याच हॉस्टेल ला राहिल्याने आजूबाजूच्या सर्व लोकांशी चांगला परिचय झाला होता) पण तेंव्हा नकोसा असणारा चहा आज अगदी हवाहवासा वाटत होता.
मानवी मन अजून काय ??
एखादी गोष्ट करायची नाही, असं ठरवलं, की ती अजून जास्त करायची इच्छा होतेच.असो, पावलं पटापट उचलत मी पुढे गेली, थोडी पुढे जाते न जाते तोच समोरच्या फ्लॅट मधले एक काका बाल्कनीत पेपर वाचत चहा पीत बसले होते.
"सकाळच्या शांततेत थंडगार हवेत एका हातात पुस्तक घेऊन गरम गरम चहा घेणे, हा माझा सर्वात आवडीचा वेळ. पुढे सरकूच नये असे वाटणारा.
आज जणू माझे पंचेंद्रिय या न त्या प्रकारे चहा चा शोध घेत होते.
दुसऱ्या दिवशी ठरवले. रस्ता बदलायचा.
कॉलनीत फिरू तर ती लोकांची चहा ची वेळ.
उगाच आपला संकल्प तुटायचा.
पहिल्यांदा 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' या रस्त्यावर लावलेल्या, पाटीवर लिहिलेल्या, वाक्याचा अर्थ कळला म्हणून मी नीरी ला एक मोठ्ठा राउंड घ्यायचा ठरवले.
दुसरा दिवस उजाडला आणि मी नीरीच्या दिशेनी पावले वळवली. झालं, आज काहीच अडचण नाही.सोप्पं आहे. असं म्हणता म्हणता.
समोर चहाची गाडी.
भर पावसाळी वातावरणात रात्रीच्या पावसाने चिंब भिजलेल्या रस्त्यांवर 'मॉर्निंग वॉक ' घेत असताना चहाची गाडी समोर .
चहाच्या भांड्यातून व कपातून निघणारी गरम गरम वाफ, नाही का जिभेला चटका लावणारं?
हा चटका पण अजब, 'जिभेला चहाचा चटका न लागू देता नुसता पाहूनच चटका लागतो'.
तशीच पाहून न पाहून मी चहा ची गाडी पार केली.
आणि सोबतच विचारही....
हॉस्टेल ला पोहोचते तोच हाक आली 'दीदी,चाय पिने अाओ'
मनावर दगड ठेऊन, अरे तू एन्जॉय कर, असं म्हणतच माझ्या रूम कडे वळली. असे वाटत होते की घोड्याप्रमाणे आपणही डोळ्याला झापडं लाऊन घ्यावे, जेणेकरून इकडे तिकडे कुठेच लक्ष जाणार नाही.
फ्रेश होऊन येत नाही, तोच समोर च्या रूम मध्ये राहणाऱ्या ताईंनी एक जोरात हाक दिली, आज रविवार मी सर्वांचा चहा मांडते.या सगळ्या माझ्या रूम मध्ये,चहा टोस्ट सोबत थोड्या गप्पा गोष्टी पण होतील.
एरव्ही दर रविवारी आम्ही काहीतरी 'गेट-टुगेदर' करायचोच.
कधी पोहे ,मॅगी, कच्चा चिवडा तर काही.आज??
आज नेमकी चहा. आता काय करणार???
माझी अवस्था फार दयनीय झाली होती कारण प्रत्येक जण मला आता चहा न घेण्याच कारण विचारणार. राधा व राणी सोडून कुणालाही मी चहा सोडला हे माहीत नव्हते व त्यामागील कारण देखील.
पण मैत्रिणीच त्या वात्रट पणा करणार नाही तर त्यांच्या मैत्रीला काळीमा लागला असता.
चहा चा कप माझ्या आजूबाजूला आणत म्हणायच्या.
हे बघ सोनू.
(त्या मला सोनू म्हणत)
" वो बुलाता है मगर जानेका नही"
इतका मानसिक अत्याचार सहन करत मी १५ दिवस पर पडले.वजन केले.काही फरक नाही.तरी मनाला आलेली मरगळ, मागे टाकत पुन्हा स्वतःला चालना देत, तोच दिनक्रम चालू ठेवला.
फिरायला जाणे, जिम आणि डाएट.
माझ्यात फरक पडत होता हे मला जाणवायच्या आधीच हॉस्टेल वरील मैत्रिणींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
कुणी छान तारीफ करायचं.प्रोत्साहन द्यायच.तर कुणी टोमणे.
'बस झालं, आता काय करीना कपूर बनायचं आहे का?'
तर कुणी माझी खूप काळजी असल्यासारखं भासवत,
'अग खात पीत जा तब्बेत खराब होईल.आपण काही रोड वगैरे नाही हां, होऊ शकत.प्रकृती असते एकेकाची.'
माझ्या प्रयत्नांवर पाणी फेरणाऱ्या अशा वाक्यांनी माझ्या उत्साहाचे खाच्चीकरण व्हायचे. रागही यायचा. कारण "आपण कुणाला उमेद नाही देऊ शकत तर निदान त्यावर टीका- टीपणी करून आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन तरी मांडू नएं असे मला वाटत."
पण मी उलटून एकही शब्द न बोलता,संयम ठेऊन राहत कारण तसे करणे मला त्यावेळेस तरी योग्य वाटले.
मी आनंदात राहायची.
अशा विधानांन मागची सत्यता पडताळून पाहिली तर काही अंशी खरी असली तरी 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्ती वर माझा विश्वास होता आणि कुठलेही ध्येय साध्य करायला आधी स्वतःचा विश्वास महत्वाचा असतो.
पण मी दोन्ही गोष्टी समान घ्यायच्या ठरवल्या.कुणी काहीही बोलले तरी आपण प्रयत्न सुरूच ठेवायचे.असा माझा घट्ट निर्धार होता.
तर अशा अनेक संकटांना तोंड देत मी अखेर चहा वर विजय मिळवला.
आता पुढचे १५ दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे होते.कारण १५ दिवसांनी पुन्हा एकदा वजन काट्यावर उभे राहायचे होते.
वजनदार व्यक्ती साठी ती एकप्रकारची सर्वात कठीण परीक्षाच असते. पाहता पाहता १५ दिवसही उलटले.पुन्हा एकदा देवाचे नाव घेऊन, दीर्घश्वसन करून, वजन काट्यावर आपला भार सोपवला.ते पाहून डोळे विस्फारले.माझ्या मनावर जणू भला मोठा दगड येऊन कोसळला.
हो. वजनात फरक तर पडला.पण वजन कमी नाही तर तब्बल ३ किलो ने जास्त भरले.खूप रडकुंडीला आले नव्हे रडलेच. काय चुकले? काही कळेना.
पडताळून बघितले तरी समजेना.
जीम च्या बाहेर येऊन खूप रडली.
हॉस्टेल ला आली तर माझा रडका चेहरा बघूनच काहीतरी बिनसलं, अस राधा व राणीला समजलं.
घडलेला सर्व प्रकार मी त्यांना रडत रडतच सांगितला.
त्यावर राणी म्हणली, तू आधी शांत हो.चहा घेते का थोडा??
राधा: काही जोक मारतेस राणी तू.
ती गंभीर परिस्थितीत आहे.शांत रहा.
राणी: गंभीर परिस्थिती???
राधा चा पांचट विनोद व प्रश्नार्थक चीन्हयाने बघत राणीच्या चेहऱ्यावर उमटलेले कडवट भाव बघून मला रागही आला आणि हसू ही आले.
अरे विषय काय यांच चाललंय काय?
म्हणून मी थोडी चिडलेच.पण आमच्यात सर्वकाही चालायचंच.
त्यादिवशी मात्र मी स्वतःला दिवसभर आरशात बघत होती.वाटलं, सर्व पाण्यात गेलं.वाटलं, खरंच आहे, आपण कधीच नाही रोड होऊ शकत.काही उपयोग नाही.
स्वतःला दोष देत राहिली.
इच्छा नसूनही दुसऱ्या दिवशी जिम ला गेली.
ट्रेनर म्हणाल्या अग वजन कर.
आज तुझा महिना अखेर आहे.
मला वजन करण्यात अजिबातच रस उरला नव्हता म्हणून मी काही न बोलता मानेनेच नकार दिला.
काहीतरी बिनसलं हे त्यांना देखील कळलं.
ट्रेनर: काय झालं
मी: कालच केलं
ट्रेनर: हसत हसत आज पुन्हा माझ्यासमोर कर
मी: ( मनात) यात काय हसण्यासरख??
जे महिन्याभरात शक्य झाल नाही ते १ दिवसात थोडीच होणार.
माझा प्रतिकार पाहून त्या मला जास्तच आग्रह करू लागल्या आणि थोडा रागावून म्हणाल्या,
'उद्या पासन तुला जिमला यायची गरज नाही.'
यापूर्वी त्या माझ्यासोबत अशा कधीच वागल्या नव्हत्या.
मलाही राग आला आणि रागरागत मी वजन काट्यावर चढली.
त्यांनी माझे वजन जाहीरपणे सांगितले ५२.
मी:काय??
त्या: ५२..
मी: काय??
त्या:अग खाली बघ.
मी: कस शक्य आहे??? हे वजन माझं नाही.
आनंदाच्या भरात मी मुर्खासारखे काहीतरी बरळली.
अरेच्चा हे तर काहीतरीच.
मी: पण असे झाले कसे?? कालच माझे वजन ५९ दाखवले. जेंव्हा की मागच्या महिन्यात ते ५६ झाले होते.
त्यामुळे माझा असा समज झाला की माझे वजन ३ किलो ने वाढले.
ट्रेनर: हसत हसत, काल सगळ्यांचेच वजन ५९ किलो झाले होते.
मी: म्हणजे??
ट्रेनर: अग वजनकाटा बिघडला होता.त्यामुळे तो ५९ वराच येऊन थांबायचा.
काल दुपारीच कारागीर बोलावून ठीक करून घेतला.
मी: अच्छा, तरीच तुम्ही मला वजन करण्याचा आग्रह धरला आणि माझी फिरकी घेतली.
त्यानंतर आम्ही दोघीही खळखळून हसलो.
माझे टार्गेट ५४ चे होते त्यापेक्षा २ किलो अजून कमी झाले होते म्हणजे या महिन्यात एकूण ३-४ किलो चा फरक पडला असे म्हणायला हरकत नाही.
फक्त चहा त्यागाने माझे उद्दिष्ट सफल झाले.
माझा स्वतःवर विश्वासाचं बसेना आणि माझ्या कष्टांना दाद देत आमच्या ट्रेनर म्हणाल्या:आता उद्यापासन जिम बंद.
पण सूर्यनमस्कार ,फिरायला जाणे, नियमित सुरू.
सर्वकाही खायचे पण प्रमाणात.
मला माहित आहे तुला चहा अतिशय आवडतो.
आजच्या दिवस तुला सूट.
आज आता हॉस्टेल ला जाऊन मस्तपैकी कप भर चहा पिऊन घे.उद्यापासन मात्र परत बंद.
अशा सूचना करून त्यांनी माझी जिम नावाच्या कैदेतून सुटका केली.
आता ही आनंदाची बातमी सर्व प्रथम फोन करून आईला दिली.त्यानंतर धावतच हॉस्टेल ला गेली.आनंद इतका की कॉरिडॉर मध्येच ओरडली.मला एक कप चहा हवाय, कोण बनऊन देणार?
माझा आवाज ऐकुन राधा व राणी आपापल्या रूम च्या बाहेर आल्या आणि मला नक्की वेड लागलं अशा भावनेने त्या माझ्याकडे एकटक बघू लागल्या व मी सुद्धा खूप काही सांगायचंय पण सुरुवात कुठून करावी या भावनेने त्यांच्याकडे पाहून नुसतीच हसत होते.
आम्ही शब्द गिळल्यागत चूप होतो.
५ मिनिटांनी शांततेला आळा बसला.
राणी: काल जिवाच्या आकांताने रडणारी तू आज चक्क हसत हसत चहा मागतेस...(कपाळाला हात लावून) काय तब्बेत वगैरे ठीक आहे न??
मी: आधी चहा ठेव.मग सांगते.
त्यांची उत्सुकता ताणत आणि झालेल्या चहा वर ताव मारत मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली.
तशाच त्या जोरात ओरडल्या.
अखेर या देशपांडेंनी वजनाची खिंड लढवली म्हणायची.
'देशपांडेंच्या चहा चा विजय असो.
देशपांडेंच्या चहा चा विजय असो
अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या .
या घोषणा इतक्या मोठ्या होत्या की संपूर्ण हॉस्टेल दणाणले व माझ्या चहा न घेण्याचे मूळ कारण सर्वांना कळले.इतके दिवस लपून ठेवलेले जिम,डाएट, चहा या सर्व गोष्टींचे भिंग फुटले.
आज चहाची पार्टी देशपांडे कडून म्हणून राधा नी सर्वांना जाहीर आमंत्रण दिले.
त्यानंतर हॉस्टेल वर नुसती धमाल.हॉस्टेल वर काय मुलींना एन्जॉय करायला कारणच पाहिजे असते.ते भेटले की मग विचारताच सोय नाही आणि आज त्याचे कारण मी होती. प्रत्येकजण चहा चा कप घेऊन आले आणि वाजवत वाजवत.ए वतन ए वतन.'जलवा तेरा जलवा' 'हिंदुस्तान की कसम' या चित्रपटाचे गीत गात नाचू लागले.तब्बल १ महिन्याच्या कडक निर्बंधानंतर आयुष्यात चहा नी पुन्हा एकदा जो शिरकाव केला.तो पुन्हा कधी बंद झालाच नाही. आणि एकदा वजन काट्यावर पाहिलेले ते वजन आजतागायत पुन्हा कधीच दिसले नाही.
धन्यवाद.

No comments:
Post a Comment