Pages

Friday, August 14, 2020

माझे आजोबा : कृ.वा.तारे.

मी जरी हसून आता बोलतो आहे ऋतुंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता.
माझ्या लहान पणची गोष्ट आहे मी साधारणतः ७-८ वर्षांची असताना एकदा आजी कडचा जुना फोटो अल्बम बघत होती.त्यात आजोबांचे तरुणपणी चे ही काही फोटोज् होते.ते पाहून मी आईला विचारले - आई,आजोबा एकही फोटोत हसत का नाही? त्यावर आई म्हणालीहे सर्व आजोबांचे महत्त्वाच्या कामाचे फोटोज् आहेत.आजोबांना कामानिमित्त सतत बाहेर राहावं लागतं,त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत,आणि कामाच्या वेळेस असं कुणी उगाच हसत का?

जबाबदाऱ्या म्हणजे काय ग?
माझा पुढचा प्रश्न तयार होता.त्यावर आई म्हणाली - तुला नाही कळणार सध्या.मोठी हो म्हणजे कळेल आपोआप.आज जेंव्हा समजायला लागले तेंव्हा ह्या प्रसंगाची आठवण झाली व कवी सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी स्मारल्या,त्यातला भावार्थ व आईच्या बोलण्याचा अर्थ अगदी सहज कळून आला.

मी लहान असताना आम्ही सर्व भावंड, मामा मामी,मावशी काका उन्हाळ्याच्या ह्याच दिवसात नृसिंह जयंती निमित्त अचलपूर च्या वाड्यात एकत्र जमायचो आणि परतवाडा येथे  माझे घर असल्याने एरव्ही कधी मुक्कामाने नाही जमले तरी जयंतीच्या निमित्ताने दोन दिवस आधी मात्र आई,सुमेध आणि मी मुक्कामाने जायचो.बाबा आम्हाला सोडून घरी वापस येत पण सकाळी तेही लवकरच वाड्यात येत.सर्वांसोबत त्यांनाही फार आवडायचे. सगळे जमले की संपूर्ण वाडा दणाणून जायचा.आम्हा मुलांचाही फार कल्ला असायचा. आम्ही कुणालाही ऐकत नासायचो पण मात्र दादा आजोबांना नाव सांगते म्हणलं की चूप बसायचो.आजोबांनी जर का रागावले तर आम्ही आईच्या पदराआड जाऊन लपयचो.आम्हाला आजोबांचा फार धाक होता.त्यांच्याशी बोलायची पण भीती वाटायची.याउलट आजीची मात्र कधीच भीती वाटली नाही.कारण आजीचा चेहरा नेहमी हसरा असायचा. कुठल्याही व्यक्तीला आजीकडे बघून प्रसन्न वाटेल असेच तिचे व्यक्तिमत्व आहे.
आजोबा रागावतील म्हणून आम्ही आजोबांजवळ जात नसू
पण शेवटी ते आजोबांचं नातवांना रागावणं कुठल्या आजोबांना आवडेल? ते म्हणायचे ही हे पोरं बिलकुल माझ्याकडे येत नाही, त्यांना फक्त आजीच आवडते.
वास्तविक आम्हाला दोघंही फार आवडत.आजी प्रेमळ तर आजोबा ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ.आजोबांचे जर बारकाईने निरीक्षण केले तर त्यांच्या दैनंदिनी ला एक प्रकारची शिस्त होती येवढेच नव्हे तर वेळ किती मौल्यवान आहे हे त्यांच्या दैनंदिनी तून प्रकर्षाने जाणवत.कारण ते सतत कामात असायचे.स्वतःच्या संघर्षातून केलेले त्यांचे कार्य आज मूर्त रुपात सर्वांसमोर उभेच आहे.परंतु अमूर्त कार्य म्हणजे त्यांचे घरी सुद्धा व्यस्त असलेले जीवन.एखादा दिवस त्यांना संपूर्ण घरी भेटला तरी ते गप्पा गोष्टी करत न बसता फावल्या वेळात देखील पुस्तक हातात घेऊन वाचन करत.आंघोळीनंतर नित्यनेमाने पूजा,जप हे सर्व त्यांचं ठरलेलं असतं.मग दिवस व्यस्त असो की मोकळा देवापुढे क्षणभर तरी नतमस्तक झाल्याशिवाय ते त्यांचे पुढील कुठलेच काम करत नसत.

सनावरानिमित्त्या अनेकवेळा वाड्यात आम्ही सर्व नातलग एकत्र यायचो.घरात सर्व मंडळी जमली की अनेक गमती जमती नकला व्हायच्या.अजोबसुद्धा अधेमधे एखादी चक्कर टाकत.कारण सगळे आले की त्यांना फार आनंद होत. गोतावळा त्यांना फार आवडत.आजोबांनी चक्कर टाकली की घरचे मोठे देखील शांत होत.मध्येच कुणी त्यांना विचारात दादा तुम्हाला भूक लागली का?काही हवं का? पण मानेनेच नकार देऊन ते तिथून निघून जात, तेंव्हा मला वाटायचे की कदाचित त्यांनाही गमतीजमती ऐकायच्या असतील म्हणूनच ते इथे आले असावे पण त्यांच्या येण्याने गमती च थांबल्या म्हणून ते निघून गेले.म्हणजे घरातील मोठेही त्यांना घाबरतात.म्हणून मी आजीला विचारले की आजी, सगळे आजोबांना भितात तुला नाही का त्यांची भीती वाटत? तेंव्हा आजी म्हणायची आजोबांना भ्यायला काय ते वाघ सिंह आहेत? आणि बेटा अग त्यांना कुणी भित नाही तर ते घरात सर्वात मोठे आहे की नाही त्यामुळे त्यांच्यासमोर असे मोठमोठ्याने हसणे,गम्मत करणे बरे दिसतं का?नाही न म्हणून सगळे शांत राहतात. तू जी भीती म्हणत आहे न, ती भीती नसून धाक आहे त्यांचा हा धाक  आदरापोटी असतो. सगळे एकत्र आले न की त्यांनाही फार आनंद होतो.मला जसा तुमचा नातवंडांच्या लाड येतो की नाही तसा त्यांनाही येतो पण ते तेवढा व्यक्त करू शकत नाही ते वरवर जरी कडक दिसत असले ना तरी मनातून तेवढेच हळवे आहेत आणि त्यांचा हा स्वभाव मला माहित असल्याने मला त्यांची भीती नाही तर आदरच वाटतो आणि अभिमान सुद्धा.
आजी हे तुला त्यांनी कधी सांगितलं? माझा बालिश प्रतिप्रश्न तयार. त्यावर आजी हसून म्हणाली - अग आपल्या लोकांना आपण निरिक्षणातून कृतीतून समजून घ्यावं लागतं.प्रत्येक गोष्ट अशी कुणी बोलून थोडीच दाखवत. त्यादिवशी पासून माझे विचार चक्र सुरू झाले ,मलाही आजोबांना समजून घ्यायचं होतं.त्यामुळे मी अचलपूर ल गेली की आजीला वाघ सिंह,राजा राणी क्या गोष्टी सोडून आजोबंनबद्दल संग म्हणायची आणि आजीही अगदी आनंदानी आणि कौतुकाने मला त्यांच्या गोष्टी सांगायची व अनुभवातून कसे शिकायचे याबद्दल ही ती बोलत.
आजीच्या गोष्टी ऐकून मनातली सर्व प्रश्नावली मी आईसमोर मांडत.उत्तर मिळाल्याशिवाय काही माझे समाधान होत नसत.अशाच गोष्टी,गमतीजमती ऐकत मी हळुहळू मोठी होऊ लागली.आता जवळ जवळ सर्व गोष्टी ऐकून झाल्या होत्या. आजोबांनी कशाप्रकारे संस्था उभारल्या?त्यासाठी त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले?कशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करावा लागला? हे सर्व सांगत असताना कधी कधी आईच्या डोळ्यातून पाणी येत.लगेच ती डोळे पुसून म्हणायची - बेटा तुझ्या आजोबंमध्ये फार हिम्मत आहे कारण ते नेहमी खरं बोलतात.परखडपणे आपले मत मांडतात आणि ते नेहमी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहतात.त्यांना ह्या प्रवासात अनेक लोकांनी मदत केली.ते सर्व आजोबा जाणतात. म्हणून अशा सर्व लोकांना ते धरून आहेत.माणूस जोडणं ही सुद्धा एकप्रकारची कला आहे.ती तुझ्या आजोबांच्या अंगी आहे. तुला एक सांगते कुठलीही गोष्ट ही तोडण सोपी असते जोडण कठीण. हळूहळू आजोबांचे जीवन नकळतपणे आदर्श वाटू लागले.आणि मला त्यांचा विषयी वाटणारा धाक हा प्रचंड आदरात बदलला होता.आणि एक गोष्ट अगदी ठामपणे कळली होती की कुठलीही अपेक्षा न करता  आजोबा नेहमी जीवनप्रवास मार्ग काढत असायचे काते बाजूला करून आणि फुलं वेचून -
 
 सूर मागू तुला मी कसा?
 जीवन तू कसा मी असा.
 दुःख माझा तुझा आरसा.
 जीवना तू कसा मी असा.

एकदाही मनासारखा,
तू न झालास माझा सखा.
खेळलो खेळ झाला जसा.
जीवना तू कसा मी असा.

आजोबांना ऐकुन मी माझ्या परीने समजले होते पण आता अनुभवात न समजणे सुरू झाले होते.

आजोबांना मी कधीही पुजेशिवय म्हणजे संध्या, जप केल्याशिवाय घराबाहेर पडताना पाहिले नव्हते.
जो माणूस विद्वान असतो,कर्तबगार असतो तो सहसा देव मानीत नाही.मग आजोबांची देवावर इतकी श्रद्धा का?
पण आता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माझी मलाच शोधायची होती.
तेंव्हाच कळून आले की कदाचित चांगल्या कामांच्या आधी आजोबा देवापुढे नतमस्तक होऊन ते आपली आत्मिक शक्तीच वाढवतात.त्यांच्या ठाई असलेली हिम्मत,वाचा,सद्गुणांची पुंजी जपण्यासाठी ते एका दिव्याशक्तीपुढे नतमस्तक होतात.

आजोबा ज्याप्रमाणे धार्मिक गोष्टी चुकत नसे त्याप्रमाणे मागे कितीही व्याप असला तरी कुटुंबाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही.घरात कुणाला साधा तापही आला तरी आजोबा सर्वात पहिले दवाखान्यात हजार होत,पूर्ण लक्ष घालून डॉक्टरांशी बोलून पूर्ण उपचार होईपर्यंत हलतही नव्हते. आज वयाच्या ८१ व्य वर्षी आजोबा त्याच ताठस्थ भूमिकेत असतात.आम्हा तरुण मुलांना एव्हाना त्यांच्याच नातवंडांना लाजवेल इतकी उमेद त्यांच्यात आजही आहे.त्यांच्या या स्वभावामुळे मला एक मामा आणि एक मावशी नसून मी नेहमी ९ मामा आणि ६ मावशा मोजायची.हळूहळू या संख्येत भर पडतच गेली.आजोबांचे कुटुंब कधीच मर्यादित नव्हते.असे असूनही आजोबांनी शिक्षणाचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला.

रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा

आजोबांच्या कुटुंबाचा विस्तार हा त्यांच्या ब्लड रिलेशन पुरता मर्यादित नव्हता तर त्यांचे दुसरे कुटुंब होते ते त्यांच्या संस्थेतील सर्व सदस्यांचे.त्यांच्या सुख दुःख प्रसंगी आजोबा स्वतःच्या तब्बेतीची चिंता न करता प्रत्येक वेळेस उपस्थित राहायचे फोन करून अभिनंदन करणे किंवा सांत्वन करणे त्यांना कधीच जमले नाही कारण ते नेहमी त्यांच्या सुखदुःखाच्या सहभागी होते. वैयक्तिक कारणे देऊन पळवाटा काढणाऱ्यांच्या जगात आजोबा रमत नाही कारण-

भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
येवढे मी भोगले की मज हसावे लागले
ठेवले आजन्म डोळे अपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले

अनेकदा आजोबा कामानिमित्त नागपुरात आले की मी त्यांच्या सोबत सगळीकडे जायची किंवा कधी कधी त्यांच्या सोबत नागपूर परतवाडा प्रवास देखील व्हायचा.
प्रवासात आजोबा मला अनेक गोष्टी सांगायचे.त्यांच्या विषयात कधी विनोबा,सांने गुरुजी तर कधी महात्मा फुले आंबेडकर असायचे.कधी साहित्य,काव्य तर कधी नाट्य असायचे.कधी क्रिकेट तर कधी राजकारण,कधी भाषा तर कधी विज्ञान,कधी शिक्षण तर कधी शेती हे विषय असायचे.आजोबांच्या वाचनाला मर्यादा नव्हती आणि त्यामुळे ज्ञानालही मर्यादा नव्हती.आजोबंसोबतचे हे सर्व प्रवास माझ्या मनाला नेहमीच आनंद द्यायचे.आजोबा नेहमीच म्हणत कुठलाही धर्मग्रंथ किंवा पुस्तक कधीच नसते.ते ज्ञानाचे साधन आहे.आपण त्याच्याशी कसे जुळतो यावर आपले विचार ठरतात आणि मग आपण निरनिराळ्या जाती धर्म आणि पंथात विभागल्या जातो.

आजोबा आणि राम आजोबा शेवाळकर या दोघांकडे बघतांना मी नेहमी मित्र म्हणून बघायची.मैत्रीचे नाते खर तर थट्टा मस्करीचे असते.पण दादा आजोबा केंव्हाही राम आजोबंबद्दल बोलायचे तेंव्हा त्यांच्या बोलण्यात मला नेहमीच एक आदर जाणवायचा, प्रेम जाणवायचे.मैत्रीचे अनोखे भाव मी त्यांच्याकडूनच शिकली.आज मैत्री जिथे व्यवहारिक रुपात पाहायला मिळते त्या युगात मित्राची ओढ आजोबंमधे मी नेहमीच बघायची.कित्येकदा आजोबा नागपूरला आले की माझ्याही आधी राम आजोबांना भेटायला जात असत.

आजोबांनी मैत्रीचे नाते केले, जपले आणि जगले सुद्धा.
काही मित्र आजोबांना संस्थेनिमित्त भेटले पण त्यांच्याशी त्यांचे भावनिक नाते जुळले आहे. कवी सुरेश भटांच्या ज्या काव्य पंक्ती या लेखात घेतल्या त्याही आजोबांकडून त्यांच्या मैत्रीचे प्रसंग ऐकुन. त्यांच्या काव्य संग्रहाचे वाचन केले आणि त्यांच्या कवितेच्या ओतप्रोत भावनेत भिजली जसे -
जन्मभर अश्रुस माझ्या शिकविले ना ना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही
स्मारतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे
येवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही.

आजोबांच्या सामाजिक आणि कौटुंबिक वाटचालीत आजोबा व सर्व कुटुंबीयांना अनेक अघटीत प्रसंगांना तोंड द्यावे लागले व कुटुंब प्रमुख म्हणून पुन्हा हिमतीने आजोबांना पाठीशी उभे राहावे लागले.

दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जुळल्या माझ्या आत दंग झालो
आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखा सवे
संभाळूनी घेती मला माझी इमानी आसवे

अतिशय गरीब परिस्थितीतून  स्वतःच्या परिश्रमातून आणि ज्ञान साधनेतून समोर आलेल्या माझ्या आजोबांना कर्तव्याकडे पाठ वळऊन आणि जबाबदाऱ्या झटकून प्रसिद्धीचा मोह कधीही का आला नसेल? या प्रश्नाचे उत्तर शोधताना जाणवले की त्यांच्या वाटचालीत सर्वप्रथम शोध होता तो त्यांच्या अस्तित्वाचा.

किरण एक धरणी हाती मी पुढे निघालो
अन् तसाच वांवंतांना मी मला मिळाला

वारसा हक्काने चालत येणारी सतगुनांची पूंजी
आम्हाला त्यांच्या अस्तित्वाच्या शोध प्रवासातून त्यांचे तत्व आणि जीवन मूल्यांच्या रुपात भेटली, तिची जपणूक आणि वाढ करण्यासाठी ही पूंजी मी आजोबांना त्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्त आशीर्वादाचा रूपाने आम्हा सर्व नातवंडांकरिता मागते आणि आपल्यातली पुढे चालत राहण्याची व आयुष्याच्या प्रवासात न थांबता न डगमगता नवीन आशेने पुन्हा उठून उभे राहण्याची उमेद मागते

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.

✍️Suwarna
Late Post:
१३/०५/२०१३


Sunday, August 2, 2020

जो तो मती सापडला


                      आज मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देण्यास सकाळी फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईट ला विझिट दिली. बघते तर काय आधीच नोटिफिकेशन्स  ची रांग लागली होती. आवडत्या पोस्ट लाइक  करून सहज स्क्रॉल खाली नेला तर एकीकडे "लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी" अशा महान काव्याने मराठी मनाला बांधून ठेवणारी काव्य, तर  लगेच दुसरीकडे  मराठी मनातील मतभेदांचे रूपांतर जातीयवाद, वर्चस्ववाद दर्शवणार्या, काटेरी शब्द कट्यारा कडे गेले.हे सर्व बघून दोन मिनिटे मन सुन्न झाले.शुभेच्छा तर दूरच, पण आता हसावे,रडावे की,अगदी जगाकडे पाठ फिरवून, आमचे काही घेणेदेणे नाहीं, अशा आविर्भावात बसावे तेच कळत नव्हते. आणि सर्वात कमाल म्हणजे, सुशिक्षित  म्हणवणारे,स्वताच्या कार्यक्षेत्रात अतिशय उत्कृष्ट कार्यरत असणारे, दिग्गज मंडळी, इतिहासाचा  स्वतःच्या  मनाप्रमाणे ,अगदी सोईस्कर रीत्या वापर करून, आम्ही कसे श्रेष्ठ? हे दर्शवण्यासाठी, आपसी संबंध विसरून अगदी लहानमुलागत भांडत  होते. लहान मुलांच्या भांडणाला तरी काही अर्थ असतो किंवा निरागस असे  एखादे उद्दिष्ट असते. खरे पाहता, 'इतिहास हा आपल्या सर्वांनाच स्वाभिमानाचा विषय आहे. वाद उत्पन्न  करण्याचा नाही. ' पण पोरकटपणाने भांडून, आपले सर्व संस्कार, शिक्षण, अनुभव, गुंडाळून ठेवत, मतभेदाचे नाव देऊन, वादग्रस्त विषय,पुनः पुनः काढून, सोशल मिडिया वर भांडणाऱ्या महंत लोकांना काय म्हणावे?

अगदीच वर वर बघता हा विषय  विचारांना गाम्भीर्याकडे नेत असतांनाच मोबाइल वाजला, मैत्रिणीचा फ़ोन होता. तिची एक व्यक्तिगत  समस्या तिने माझ्याकड़े विश्वासाने व्यक्त केली. त्यावर काळजी करू नकोस। आम्ही तुझ्याबरोबर  आहोत. असे बोलून  फ़ोन ठेवल्यावर एक गोष्ट लक्षात आली की "मैत्री ही एकमेव भावना माणसाला - जात, धर्म ,श्रीमंती,गरीबी या सर्व भावनांच्या पलीकडे नेऊन ठेवते." मग सोशल मेडियावरच मनातला सर्व राग काढून हे फेसबुक  फ्रेंड्स म्हणवणारे शत्रु प्रत्यक्ष भेटीत "मैत्री निभवतात की पोस्ट नंतर शत्रुता?" असा थोड़ा मिश्क़ील प्रश्न मनाला हसवुन गेला आणि  मराठी भाषा दिवस हा
मराठमोळ्या लोकांच्या विचारताच  मावळला.

दुसऱ्या दिवशी बघते तर काय आश्चर्यच.  आदल्याच दिवशी फेसबुक वर स्वत:च्या वर्चस्वाची ग्वाही देत,  एकमेकांवर आरोपांचे  ताशेरे ओढणारे, इतिहासाचे उपासक असलेल्या लोकांमधलेच, दोन लढ़वैये,जेंव्हा प्रत्यक्ष भेटीत एकमेकांच्या गळ्यात गळे  घालून  तत्व,समानता, धर्मनिरपेक्ष राज्य अशा  मोठ- मोठ्या विषयांवर गहन चर्चा करतांना दिसली तेंव्हा तर कपाळावर हात मारणेच  बाकी राहिले होते. येवढेच नव्हे तर  हे बहाद्दर, एकमेकांच्या हो ला हो मिसळत 'कुठे चाललय जग?'  म्हणत एकमेकांना  पाठबळ देत होते .आता   मात्र मला स्वतःच्याच  प्रश्नाचे उत्तर  भेटले - अशा विद्वानांच्या सभेत आपणच ठरणार मुर्ख. कारण -
                               " जो तो मती सापडला, तयाची तोची थोर."

Saturday, August 1, 2020

चहा, मी आणि बरच काही.☕👩🍴🥒🥕

बी.एस.सी. ची परीक्षा झाली, शेवटचा पेपर संपला तोच आनंदाच्या भरात हॉस्टेल ला आली व फ्रेश होऊन थेट राधा च्या रूम मध्ये गेली..राणी तिथे माझ्या आधीच हजार झाली होती.राधा आणि राणी ह्या माझ्या हॉस्टेल च्या घनिष्ट मैत्रिणी.आमच्या तिघिंच्या रूम वेगवेगळ्या होत्या.तरी  तिन्ही रूम वर आमचा समान हक्क होता. आमचा venue ह्या तीन रूम भोवती फिरत राहायचा.म्हणजे आम्हाला शोधणे सोपे होते.एक जण जिथे तिथेच तिघीही.असे गणित हॉस्टेल च्य इतर मैत्रिणींनी मांडले होते.आज राधा च्या रूमचा नंबर होता.त्यामुळे गरम गरम चहाचा कप राणीला व मला हातात भेटला.चहा टोस्ट सोबत गप्पा म्हणजे मज्जाच मज्जा.गोष्टी रंगात आल्या होत्या,तोच बोलता बोलता सहज नजर तिच्या रूम मध्ये असलेल्या गोदरेजच्या जुन्या कपाटाच्या आरशाकडे वळली.पाहून थोडी अस्वस्थ झाले.म्हणून जवळ जाऊन निरखून बघितले.परीक्षेच्या काळात बसून बसून वाढलेले वजन नजरेतन सुटणार कसे?

आता मात्र वातावरणातील मजा जाऊन चिंतेने शिरकाव केला व अखेर दीर्घ चींतनानंतर जिम लावायचा निर्णय घेतला.त्याचदिवशी राणी ला सोबत घेऊन जवळच असलेल्या जिम मध्ये गेली.तिथल्या ट्रेनर आमच्या ओळखीच्या होत्या.दुसऱ्या दिवसापासनच जिम जॉईन करण्याचे ठरवले.जिम लावणे म्हणजे फक्त फॅट बर्न करणं नव्हे तर सोबतच डाएट प्लॅन + ड्रेस+ शुस+ Yoga mat+ पाण्याची बॉटल यांची जुळवाजुळव सुरू झाली आणि मस्त उत्साहात मी माझी जीम ची बॅग पॅक केली.

दुसऱ्यादिवशी सकाळी उठून जिमला  गेली.गेल्या-गेल्या वजन केले.५० च्या पाढ्यातल्या वजनाने ६० च्या पाढ्यात शिरकाव केला होता.पुन्हा त्याला मूळ पदावर आणायचे, नव्हे थोडे जास्तच कमी करायचे कारण जीम सोडले की वजन वाढते असे ऐकले होते त्याप्रमाणे मनाशी खूणगाठ बांधून मी फार उत्साहात जीम सुरू केली.

मला माझ्या अपेक्षेनुसार प्रोटोकॉल हवा होता ज्यात मला मॅन्युअल जास्त हवे होते म्हणजे मशिन्स चा वापर कमी. त्यानुसार ट्रेनर नी मला काही प्लान सजेस्ट केले त्यातला एक स्वीकारून, मी फक्त ट्रेडमिल वर १०- १५ मिनिट वॉक आणि  सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, योगा यावर भर दिला.
अशाप्रकारे पहिला दिवस तर छानच गेला.

पण मला सकाळी ८ ची बॅच भेटली. आधीची बॅच फुल होती. त्यामुळे मला ट्रेनर नी सकाळी ६ वाजता उठून morning walk १/२तास + १५ मि. आराम+ त्यानंतर हलकासा snack  नंतर १ तासाची गॅप घेऊन जिम ला येण्यास सांगितले.

सकाळचे रूटीन ठरले.डाएट ठरला. हॉस्टेल ला राहत असल्यामुळे मिळमिळीत च भेटायचं,त्यामुळे वेगळा डायट काय करणार?? फक्त बाहेरचे खाणे, म्हणजे समोसा, कचोरी सारखे पदार्थ बंद झाले.फक्त दोन वेळेसचा टिफीन भेटायचा, त्यातही भात वर्ज्य आणि दोन वेळेस चहा टोस्ट. झालं,मोहीम सुरू...

महिन्याभरात चांगला रिझल्ट दिसून आला म्हणून दुसऱ्या महिन्यात सुद्धा हाच प्लॅन सुरू ठेवला. प्रगती सुरळीत सुरू होती.माझ्या जिम ट्रेनर देखील सतत प्रोत्साहित करत राहायच्याच.तुझा ग्राफ खूप चांगला आहे.त्यामुळे मलाही हळू हळू छान वाटायला लागले होते.अगदी झीरो फिगर नसले तरी एका नियमित आकृतीत बसावं अस प्रत्येक मुलीला वाटतच असतं आणि तब्बेतीच्या दृष्टींनी देखील ते महत्त्वाचाच नाही का??

मग हळूहळू जिद्द देखील वाढू लागली.अवघ्या ३ महिन्यात मी ८ किलो वजन अगदी आरामात कमी केले.माझ्या उंची नुसार वजन यायला २ किलो चा फरक राहिला होता.खरी गम्मत तर आता होती...

आणखी एक महिना गेला दैनंदिनी जशी च्या तशीच.तरीही वजन काही केल्या कमी होई ना. मग जिम ट्रेनर ला माझी अवस्था सांगितली.

त्या म्हणाल्या : गोड बंद कर.
मी: चहा सोडून  मी काहीच गोड खात नाही.
त्या: तेच तर मूळ कारण आहे वजन कमी न होण्याचं.
मी: पण ८ किलो कमी झालं तेंव्हा मी चहा घेतच होती.
त्या :जे ओवर वेट होतं ते लवकर कमी झालं.
आता मुळावर घाला घालायचा असेल तर चहा बंद कर. घ्यायचाच राहिला तर 'ग्रीन टी' घे.

पुन्हा उत्साह संचारला .
हे उर्वरित २ किलो तर मी कमी करूनच राहील.
आता हा विषय माझ्यासाठी माझ्या अस्तित्वाचा झाला होता कारण त्यानंतर कदाचित माझी गणना ही जाड मुलींमध्ये न होता व्यवस्थित किंवा अवरेज मुलींमध्ये येणार होती.निदान असा माझा तरी समज होता.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठून 'ग्रीन टी' बनवला.
पहिल्याच घोटाला बाहेर काढावं वाटणारा चहा, मी खूपच चविष्ट म्हणून गिळंकृत केला.
स्वतःला प्रोत्साहन देण्यासाठी मी माझ्यापुरतं मर्यादित,एक खोटं जग 'false world' ज्याला म्हणू निर्माण केलं.ज्यात मला जे वाटतं तेच घडतंय.असं समजून मी खुश रहायची.कारण खूप कठीण असतं, आपल्या इतक्या वर्षाच्या सवइ बदलण.

"चहा त्याग मोहीम" सुरू. ग्रीन टी घेऊन,  ' स्पोर्ट शूज ' वगैरे घालून मी बाहेर फिरायला निघाली.

माझे हॉस्टेल हे लक्ष्मीनगर परिसरात भर वस्तीत होते. समोर मोठ्ठा व्हॉली बॉल ग्राउंड होता.
पहिली प्रदक्षिणा ग्राउंड भोवती मारून नंतर आसपास च्या भागात फिरणे असा माझा नित्य नेम आधीपासनच होता.

 मी सकाळी ६ वाजता उठून नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला निघाली.तोच एका सुंदर परिचीत सुगंधाने माझे मन ढवळून निघाले.तो सुगंध पारिजातकाचा नसून, सकाळच्या चहाचा होता, नजर वासाच्या दिशेनी वळायच्या आधीच, शेजारच्या काकूंच्या घरातून, कप बशीचा आवाज आला.ते दोघे घराच्या बाहेरील अंगणातील बंगई वर बसून नेहमीच चहा पीत. कित्येकदा मला बोलवत. हो.(तीन वर्षे त्याच हॉस्टेल ला राहिल्याने आजूबाजूच्या सर्व लोकांशी चांगला परिचय झाला होता) पण तेंव्हा नकोसा असणारा चहा आज अगदी हवाहवासा वाटत होता.

मानवी मन अजून काय ??
एखादी गोष्ट करायची नाही, असं ठरवलं, की ती अजून जास्त करायची इच्छा होतेच.असो, पावलं पटापट उचलत मी पुढे गेली, थोडी पुढे जाते न जाते तोच समोरच्या फ्लॅट मधले एक काका बाल्कनीत पेपर वाचत  चहा पीत बसले होते.

"सकाळच्या शांततेत थंडगार हवेत एका हातात पुस्तक घेऊन गरम गरम चहा घेणे, हा माझा सर्वात आवडीचा वेळ. पुढे सरकूच नये असे वाटणारा.

आज जणू माझे पंचेंद्रिय या न त्या प्रकारे चहा चा शोध घेत होते.

दुसऱ्या दिवशी ठरवले. रस्ता बदलायचा.
कॉलनीत फिरू तर ती लोकांची चहा ची वेळ.
उगाच आपला संकल्प तुटायचा.
पहिल्यांदा 'मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक' या रस्त्यावर लावलेल्या, पाटीवर लिहिलेल्या, वाक्याचा अर्थ कळला म्हणून मी नीरी ला एक मोठ्ठा राउंड घ्यायचा ठरवले.

दुसरा दिवस उजाडला आणि मी नीरीच्या दिशेनी पावले वळवली. झालं, आज काहीच अडचण नाही.सोप्पं आहे. असं म्हणता म्हणता.
समोर चहाची गाडी.

भर पावसाळी वातावरणात रात्रीच्या पावसाने चिंब भिजलेल्या रस्त्यांवर 'मॉर्निंग वॉक ' घेत असताना चहाची गाडी समोर .
चहाच्या भांड्यातून व कपातून निघणारी गरम गरम वाफ, नाही का जिभेला चटका लावणारं?

हा चटका पण अजब, 'जिभेला चहाचा चटका न लागू देता नुसता पाहूनच चटका लागतो'.
तशीच पाहून न पाहून मी चहा ची गाडी पार केली.
आणि सोबतच विचारही....

हॉस्टेल ला पोहोचते तोच हाक आली 'दीदी,चाय पिने अाओ'
मनावर दगड ठेऊन, अरे तू एन्जॉय कर, असं म्हणतच माझ्या रूम कडे वळली. असे वाटत होते की घोड्याप्रमाणे आपणही डोळ्याला झापडं लाऊन घ्यावे, जेणेकरून इकडे तिकडे कुठेच लक्ष जाणार नाही.

फ्रेश होऊन येत नाही, तोच समोर च्या रूम मध्ये राहणाऱ्या ताईंनी एक जोरात हाक दिली, आज  रविवार मी सर्वांचा चहा मांडते.या सगळ्या माझ्या रूम मध्ये,चहा टोस्ट सोबत थोड्या गप्पा गोष्टी पण होतील.

एरव्ही दर रविवारी आम्ही काहीतरी 'गेट-टुगेदर' करायचोच.
कधी पोहे ,मॅगी, कच्चा चिवडा तर काही.आज??
आज नेमकी चहा. आता काय करणार???

माझी अवस्था फार दयनीय झाली होती कारण प्रत्येक जण मला आता चहा न घेण्याच कारण विचारणार. राधा व राणी सोडून कुणालाही मी चहा सोडला हे माहीत नव्हते व त्यामागील कारण देखील.

पण मैत्रिणीच त्या वात्रट पणा करणार नाही तर त्यांच्या मैत्रीला काळीमा लागला असता.
चहा चा कप माझ्या आजूबाजूला आणत म्हणायच्या.
हे बघ सोनू.
(त्या मला सोनू म्हणत)
" वो बुलाता है मगर जानेका नही"

इतका मानसिक अत्याचार सहन करत मी १५ दिवस पर पडले.वजन केले.काही फरक नाही.तरी मनाला आलेली मरगळ, मागे टाकत पुन्हा स्वतःला चालना देत, तोच दिनक्रम चालू ठेवला.
फिरायला जाणे, जिम आणि डाएट.

माझ्यात फरक पडत होता हे मला जाणवायच्या  आधीच  हॉस्टेल वरील मैत्रिणींच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या.
कुणी छान तारीफ करायचं.प्रोत्साहन द्यायच.तर कुणी टोमणे.

'बस झालं, आता काय करीना कपूर बनायचं आहे का?'
तर कुणी माझी खूप काळजी असल्यासारखं भासवत,
'अग खात पीत जा तब्बेत खराब होईल.आपण काही रोड वगैरे नाही हां, होऊ शकत.प्रकृती असते एकेकाची.'

माझ्या प्रयत्नांवर पाणी फेरणाऱ्या अशा वाक्यांनी माझ्या उत्साहाचे खाच्चीकरण व्हायचे. रागही यायचा. कारण "आपण कुणाला उमेद नाही देऊ शकत तर निदान त्यावर टीका- टीपणी करून आपल्या संकुचित वृत्तीचे प्रदर्शन तरी मांडू नएं असे मला वाटत."
पण मी उलटून एकही शब्द न बोलता,संयम ठेऊन राहत कारण तसे करणे मला त्यावेळेस तरी योग्य वाटले.
मी आनंदात राहायची.
अशा विधानांन मागची सत्यता पडताळून पाहिली तर काही अंशी खरी असली तरी 'प्रयत्नांती परमेश्वर' या उक्ती वर माझा विश्वास होता आणि कुठलेही ध्येय साध्य करायला आधी स्वतःचा विश्वास महत्वाचा असतो.
पण मी दोन्ही गोष्टी समान घ्यायच्या ठरवल्या.कुणी काहीही बोलले तरी  आपण प्रयत्न सुरूच ठेवायचे.असा माझा घट्ट निर्धार होता.
तर अशा अनेक संकटांना तोंड देत मी अखेर चहा वर विजय मिळवला.

आता पुढचे १५ दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचे होते.कारण १५ दिवसांनी पुन्हा एकदा वजन काट्यावर उभे राहायचे होते.
वजनदार व्यक्ती साठी ती एकप्रकारची सर्वात कठीण परीक्षाच असते. पाहता पाहता १५ दिवसही उलटले.पुन्हा एकदा देवाचे नाव घेऊन, दीर्घश्वसन करून, वजन काट्यावर आपला भार सोपवला.ते पाहून डोळे विस्फारले.माझ्या  मनावर जणू भला मोठा दगड येऊन कोसळला.

हो. वजनात फरक तर पडला.पण वजन कमी नाही तर तब्बल ३ किलो ने जास्त भरले.खूप रडकुंडीला आले नव्हे रडलेच. काय चुकले? काही कळेना.
 पडताळून बघितले तरी समजेना.
जीम च्या बाहेर येऊन खूप रडली.
हॉस्टेल ला आली तर माझा रडका चेहरा  बघूनच काहीतरी बिनसलं, अस राधा व राणीला समजलं.
घडलेला सर्व प्रकार मी त्यांना रडत रडतच सांगितला.

त्यावर राणी म्हणली, तू आधी शांत हो.चहा घेते का थोडा??
राधा: काही जोक मारतेस राणी तू.
ती गंभीर परिस्थितीत आहे.शांत रहा.
राणी: गंभीर परिस्थिती???

राधा चा पांचट विनोद व प्रश्नार्थक चीन्हयाने बघत राणीच्या चेहऱ्यावर उमटलेले कडवट भाव  बघून मला रागही आला आणि हसू ही आले.
अरे विषय काय यांच चाललंय काय?
म्हणून मी थोडी चिडलेच.पण आमच्यात सर्वकाही चालायचंच.

त्यादिवशी मात्र मी स्वतःला दिवसभर आरशात बघत होती.वाटलं, सर्व पाण्यात गेलं.वाटलं, खरंच आहे, आपण कधीच नाही रोड होऊ शकत.काही उपयोग नाही.
स्वतःला दोष देत राहिली.

इच्छा नसूनही दुसऱ्या दिवशी जिम ला गेली.
ट्रेनर म्हणाल्या अग वजन कर.
आज तुझा महिना अखेर आहे.
मला वजन करण्यात अजिबातच रस उरला नव्हता म्हणून मी काही न बोलता मानेनेच नकार दिला.

काहीतरी बिनसलं हे त्यांना देखील कळलं.
ट्रेनर: काय झालं
मी: कालच केलं
ट्रेनर: हसत हसत आज पुन्हा माझ्यासमोर कर
मी: ( मनात) यात काय हसण्यासरख??
जे महिन्याभरात शक्य  झाल नाही ते १ दिवसात थोडीच होणार.

माझा प्रतिकार पाहून त्या मला जास्तच आग्रह करू लागल्या आणि थोडा रागावून म्हणाल्या,
'उद्या पासन तुला जिमला यायची गरज नाही.'

यापूर्वी त्या माझ्यासोबत अशा कधीच वागल्या नव्हत्या.
मलाही राग आला आणि रागरागत मी वजन काट्यावर चढली.
त्यांनी माझे वजन जाहीरपणे सांगितले ५२.
मी:काय??
त्या: ५२..
मी: काय??
त्या:अग खाली बघ.
मी: कस शक्य आहे??? हे वजन माझं नाही.

आनंदाच्या भरात मी मुर्खासारखे काहीतरी बरळली.
अरेच्चा हे तर काहीतरीच.

मी: पण असे झाले कसे?? कालच माझे वजन ५९ दाखवले. जेंव्हा की मागच्या महिन्यात ते ५६ झाले होते.
त्यामुळे माझा असा समज झाला की माझे वजन ३ किलो ने वाढले.
ट्रेनर: हसत हसत, काल सगळ्यांचेच वजन ५९ किलो झाले होते.
मी: म्हणजे??
ट्रेनर: अग वजनकाटा बिघडला होता.त्यामुळे तो ५९ वराच येऊन थांबायचा.
काल दुपारीच कारागीर बोलावून ठीक करून घेतला.
मी: अच्छा, तरीच तुम्ही मला वजन करण्याचा आग्रह धरला आणि माझी फिरकी घेतली.
त्यानंतर आम्ही दोघीही खळखळून हसलो.

माझे टार्गेट ५४ चे होते त्यापेक्षा २ किलो अजून कमी झाले होते म्हणजे या महिन्यात एकूण ३-४ किलो चा फरक पडला असे म्हणायला हरकत नाही.
फक्त चहा त्यागाने माझे उद्दिष्ट सफल झाले.
माझा स्वतःवर विश्वासाचं बसेना आणि माझ्या कष्टांना दाद देत आमच्या ट्रेनर म्हणाल्या:आता उद्यापासन जिम बंद.
पण सूर्यनमस्कार ,फिरायला जाणे, नियमित सुरू.
सर्वकाही खायचे पण प्रमाणात.

मला माहित आहे तुला चहा अतिशय आवडतो.
आजच्या दिवस तुला सूट.
आज आता हॉस्टेल ला जाऊन मस्तपैकी कप भर चहा पिऊन घे.उद्यापासन मात्र परत बंद.
अशा सूचना करून त्यांनी माझी जिम नावाच्या कैदेतून सुटका केली.

आता ही आनंदाची बातमी सर्व प्रथम फोन करून आईला दिली.त्यानंतर धावतच हॉस्टेल ला गेली.आनंद इतका की कॉरिडॉर मध्येच ओरडली.मला एक कप चहा हवाय, कोण बनऊन देणार?

माझा आवाज ऐकुन राधा व राणी आपापल्या रूम च्या बाहेर आल्या आणि मला नक्की वेड लागलं अशा भावनेने त्या माझ्याकडे एकटक बघू लागल्या व मी सुद्धा खूप काही सांगायचंय पण सुरुवात कुठून करावी या भावनेने त्यांच्याकडे पाहून नुसतीच हसत होते.
आम्ही शब्द गिळल्यागत  चूप होतो.

५ मिनिटांनी शांततेला आळा बसला.

राणी: काल जिवाच्या आकांताने रडणारी तू आज चक्क हसत हसत चहा मागतेस...(कपाळाला हात लावून) काय तब्बेत वगैरे ठीक आहे न??

मी: आधी चहा ठेव.मग सांगते.

त्यांची उत्सुकता ताणत आणि झालेल्या चहा वर ताव मारत मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली.

तशाच त्या जोरात ओरडल्या.

अखेर या देशपांडेंनी वजनाची खिंड लढवली म्हणायची.

'देशपांडेंच्या चहा चा विजय असो.
देशपांडेंच्या चहा चा विजय असो
अशा मोठमोठ्याने घोषणा दिल्या .

या घोषणा इतक्या मोठ्या होत्या की संपूर्ण हॉस्टेल दणाणले व माझ्या चहा न घेण्याचे मूळ कारण सर्वांना कळले.इतके दिवस लपून ठेवलेले जिम,डाएट, चहा या सर्व गोष्टींचे भिंग फुटले.
आज चहाची पार्टी देशपांडे कडून म्हणून राधा नी सर्वांना जाहीर आमंत्रण दिले.

त्यानंतर हॉस्टेल वर नुसती धमाल.हॉस्टेल वर काय मुलींना एन्जॉय करायला कारणच पाहिजे असते.ते भेटले की मग विचारताच सोय नाही आणि आज त्याचे कारण मी होती. प्रत्येकजण चहा चा कप घेऊन आले आणि वाजवत वाजवत.ए वतन ए वतन.'जलवा तेरा जलवा' 'हिंदुस्तान की कसम' या  चित्रपटाचे गीत गात नाचू लागले.तब्बल १ महिन्याच्या कडक निर्बंधानंतर आयुष्यात चहा नी पुन्हा एकदा जो शिरकाव केला.तो पुन्हा कधी बंद झालाच नाही. आणि एकदा वजन काट्यावर पाहिलेले ते वजन आजतागायत  पुन्हा कधीच दिसले नाही.

धन्यवाद.