Pages

Wednesday, July 29, 2020

यशापयश

यश किंवा अपयश म्हणजे काय हे निश्चित सांगता येत नाही..कारण प्रत्येकाच्या यशापयशाच्या व्याख्या वेगळ्या असतात..म्हणजे एका व्यक्तीसाठी जे यश आहे ते दुसऱ्या एका व्यक्तीचे अपयश असू शकते किंवा अगदी या उलट म्हणजेच एखाद्या व्यक्तीसाठी जे अपयश आहे ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे यश सुद्धा असू शकते ...यश किंवा अपयश हे एखाद्या व्यक्तीच्या भौतिक ,सामाजिक,आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीवर अवलंबून असते...
पण एक निश्चित अपयश हे क्षणिक असते म्हणून अपयशाला यशाची पायरी म्हणतात..कारण एक एक पायरी चढून च माणूस यशाचे शिखर गाठत असतो..मग त्या सगळ्या पायर्या अपयशाच्या का असोना.... यशाचे मूल्यमापन हे सुद्धा प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे केले जाते... उदाहरणार्थ: शालेय जीवनात यश हे १०/१२ वी च्या मार्कस पुरतं मर्यादित असतं, नंतर नोकरी किंवा व्यवसाया पुरतं, त्या नंतर कौटुंबिक सुख व त्याहिनंतर तुमच्या मुलाबाळांच्या यशावर हे सर्व बरोबर की चूक या वादात न पडता आयुष्याचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाच्या वाट्याला कधी तरी यश तर कधी अपयश येतच असतं.  आयुष्यात मी फक्त यशस्वी च झालो असं ठाम पणे कदाचित कुणीच सांगू शकणार नाही... कारण शिक्षण,खेळ व स्पर्धा यांच्या परीक्षा व आयुष्याने नियती नावाच्या अत्यंत कठोर शिक्षकासोबत आखलेल्या परीक्षा यांचे काहीही समीकरण जुळत नाही...त्यामुळे आज आपल्या वाट्याला जर आनंद व समाधानाचा क्षण आला असेल तर त्याचे श्रेय परमेश्वराला देऊन तो साजरा करा...परिवाराला व आप्तस्वकीयांना ही त्यात सामील करून घ्या...कुणालाही बोलण्याने  दुखवू नका....समाधानी रहा....आरोग्य जपा....जगा आणि जगू द्या.....✍️

Thursday, July 9, 2020

धूसर - एक भयकथा

कॉलेज ची ट्रिप गोव्याला जात असताना,आम्ही मुंबई ते गोवा रेल्वे नी प्रवास केला...ट्रेन रात्रीची होती..ट्रेन मध्ये बसल्यापासन आम्ही होरर गोष्टींना सुरुवात केली..उगाच मज्जा म्हणून..काहीतरी थ्रीलींग....थोड्यावेळात, रात्री १-२ चा सुमारास गाडी कुठल्यातरी एका स्टेशन वर १५ मिन.साठी थांबली..प्लॅटफॉर्म वर भयाण शांतता होती..चहा वाला सोडून कुणीही प्लॅटफॉर्म वर नव्हते..जवळजवळ निर्मनुष्य स्टेशन होते.पाय मोकळे करायला आम्ही खाली उतरलो..मजा मस्ती सुरू होती..काहींनी चहा घेतला...गाडी सुरू व्हायच्या ५ मिन आधी फोटो काढायचेच राहिले ,हे लक्षात आले,,त्यामुळे आम्ही ग्रुप करून घाईघाईत फोटो काढला..रेल्वे चां १ ला भोंगा झाला..एका मैत्रिणींनी ट्रेनच्या दारात नच आमचा फोटो घेतला...आम्ही गाडीत बसलो...फोटो पाहायला घेतले...पाहतो तर काय... आमच्या शेवटच्या काही फोटोत एक धुरकट आकृती आमच्या मागे उभी होती..जवळ जवळ ६ फुटाची..जणू कुणी माणूस पोज देऊन फोटो काढायला उभा होता...प्रत्येक फोटोत बदल पण आकृती मनुष्याची होती..जणू कुणी समवयीन आमच्यात सामील व्हायला बघत होता...त्यानंतर आमची बोलतीच बंद झाली... शब्द फुटेना...घाबरलेल्या नाजरांनी आम्ही एकमेकांकडे बघितल...त्यांनतर आम्ही आमच्या रिझर्व्हेशन च्या सिट सोडून समोरासमोर असलेल्या दोन सिट स् वर दाटीवाटीने बसलो...रात्रभर एकच विचार कोण ,का, कसं?????? त्यारात्री आम्ही कुणीही झोपलो नाही...भिलेल्या मनाला एकच आधार श्रीराम जय राम जय जय राम....