यश किंवा अपयश म्हणजे काय हे निश्चित सांगता येत नाही..कारण प्रत्येकाच्या यशापयशाच्या व्याख्या वेगळ्या असतात..म्हणजे एका व्यक्तीसाठी जे यश आहे ते दुसऱ्या एका व्यक्तीचे अपयश असू शकते किंवा अगदी या उलट म्हणजेच एखाद्या व्यक्तीसाठी जे अपयश आहे ते दुसऱ्या एखाद्या व्यक्तीचे यश सुद्धा असू शकते ...यश किंवा अपयश हे एखाद्या व्यक्तीच्या भौतिक ,सामाजिक,आर्थिक किंवा कौटुंबिक परिस्थितीवर अवलंबून असते...
पण एक निश्चित अपयश हे क्षणिक असते म्हणून अपयशाला यशाची पायरी म्हणतात..कारण एक एक पायरी चढून च माणूस यशाचे शिखर गाठत असतो..मग त्या सगळ्या पायर्या अपयशाच्या का असोना.... यशाचे मूल्यमापन हे सुद्धा प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या प्रकारे केले जाते... उदाहरणार्थ: शालेय जीवनात यश हे १०/१२ वी च्या मार्कस पुरतं मर्यादित असतं, नंतर नोकरी किंवा व्यवसाया पुरतं, त्या नंतर कौटुंबिक सुख व त्याहिनंतर तुमच्या मुलाबाळांच्या यशावर हे सर्व बरोबर की चूक या वादात न पडता आयुष्याचा समतोल राखण्यासाठी प्रत्येकाच्या वाट्याला कधी तरी यश तर कधी अपयश येतच असतं. आयुष्यात मी फक्त यशस्वी च झालो असं ठाम पणे कदाचित कुणीच सांगू शकणार नाही... कारण शिक्षण,खेळ व स्पर्धा यांच्या परीक्षा व आयुष्याने नियती नावाच्या अत्यंत कठोर शिक्षकासोबत आखलेल्या परीक्षा यांचे काहीही समीकरण जुळत नाही...त्यामुळे आज आपल्या वाट्याला जर आनंद व समाधानाचा क्षण आला असेल तर त्याचे श्रेय परमेश्वराला देऊन तो साजरा करा...परिवाराला व आप्तस्वकीयांना ही त्यात सामील करून घ्या...कुणालाही बोलण्याने दुखवू नका....समाधानी रहा....आरोग्य जपा....जगा आणि जगू द्या.....✍️

No comments:
Post a Comment