प्रिय स्वानंद,
पत्रास कारण की, आजचा दिवस हा तुझ्यासाठी अगदीच महत्त्वाचा पण नवखा असणार. नवनवीन कपडे,निरनिराळे पदार्थ,खूप मोठा खाऊ.मित्र मैत्रिणी, बँड, फटाके,हे सर्व तुझ्या आवडीच आणि फक्ततुझ्यासाठीच.गेल्या महिनाभरापासन घरात चाललेली लगबग,मुहूर्त,केळवण,अहेरखरेदी,कोडकौतुक हे सगळं तू अगदी मनसोक्त एंजॉय केलंस ,तसाच आजचा संपूर्ण दिवस देखील तुझाच आहे.देवादिकांपासन तर नातलग व तुझ्या भोवती असणारी सगळी तुझीच आप्त मंडळी तुला अनेक आशीर्वाद व भरघोस शुभेच्छा देणार.तोंडभरून तुझे कौतुकही करणार.त्यामुळे तुझ्याही अनंदाला अगदी उधाण येणार. आणि का येऊ नये?असा सुंदर दिवस आयुष्यात रोज रोज थोडीच येतो.अशा सुवर्णदिनाच्या आनंद आयुष्यात वारंवार घेता येण्यासाठी च व तुझे पुढचे जीवन सुखकर घेण्यासाठी आज एक गूढ सत्य मी तुला सांगणार आहे.
सर्वप्रथम आज तुझा उपनयन संस्कार म्हणजेच महाराष्ट्रात 'मुंज’ या नावाने प्रसिद्ध. त्या निमित्ताने तुला अनेक शुभाशीर्वाद देतो.मुंज म्हणजे काय असा प्रश्न तू मला अनेकदा केलास तर अगदी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे 'आपल्या मुलाला विद्याभ्यासा साठी गुरूच्या सानिध्यात पाठविण्यापूर्वी केला गेलेला संस्कार यालाच 'व्रतबंध’’ असेही म्हणतात.व्रतबंध म्हणजे व्रत आणि नियम यांची बद्धता. कुठलेही व्रत हे नियमंखेरिज पार पडत नसत त्यामुळेच आजपासन सुरू होणारा पहिला नियम म्हणजे रोज गायत्री मंत्राचा जप.जपाच्या सामर्थ्याने तुझ्यातले सामंजस्य दिवसागणिक वाढत जातील आणि स्वावलंबी वृत्तीचे हळूहळू व्रतात रूपांतर होईल.सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचे मार्गक्रमण " स्वावलंबन - ध्येयासक्ती - आदर्शवाद - स्वप्नपूर्ती - वैवाहिक जीवन " या पार्श्वभूमीवर घडत असते.त्यामुळेच जीवनाच्या प्रत्येक पायरीवर यशाचा मार्ग ' सत्य व प्रामाणिकपणा च्या कसोटीवर गाठतांना प्रयत्नांची मालिकाच सादर करावी लागते. तरी एक ना अनेक बिकट परिस्थिती शी झुंज देताना माणूस विचारांच्या जंजाळात असा काही अडकतो की तिथून निघण्याचा मार्गच सापडत नाही.अशावेळेस आपले आदर्श व संस्कार आपली वाट मोकळी करून देत असतात. आदर्श जीवन हे पुस्तकरूपाने तर संस्काराचे धडे स्वतःच्या कुटुंबाकडनच माणसाला भेटत असतात.
स्वानंद मला या गोष्टीची पूर्ण कल्पना आहे की तुझी पिढी ही विज्ञांतंत्रज्ञानाच्या युगात ,शहरी वातावरणात,स्वतःच्या प्रगतीच्या वाटा शोधणारी तरुण पिढी आहे. तुम्हा मुलांच्या 'Fast life ' ची संकल्पना आम्हाला देखील फार आवडते.. स्वदेशीचा काय तर विदेशी देखील तुम्ही 'Superfast' प्रगती करावी, अशीच सर्व मातापित्यांप्रमाणेच आमची देखील इच्छा आहे आणि त्यासाठीच आम्ही नेहमीच तुझ्या सोबत असू .पण बाळ,मगाशी पत्रात गूढ सत्य असे नमूद केले ते असे की भावी आयुष्याची सुखद स्वप्ने पाहत असताना आपला धर्म, संस्कृती, संस्कार व आपल्या पूर्वजांनी आखलेल्या प्रथा,परंपरा यांना तडा जाऊ नये. याची काळजी मात्र तुला प्रत्येक वळणावर जवाबदारी रूपाने घ्यायची आहे. मोठेपणी तू देश - परदेशी कुठेही असलास तरी मातृभूमीशी जुळलेली तुझी नाळ ही नेहमीच घट्ट असावी त्यासाठी लागणारा आदर्शवाद हा तुझ्या सुदैवाने तुझ्याच जवळच्या लोकांकडून शुभेच्छा व आशीर्वादाच्या रूपाने तुझ्यासोबत कायम राहील.याची मला खात्री आहे. अशीच निष्ठा बाळगून कार्य केलेस तर तुही उद्या कुणाच्यातरी आदर्श म्हणून उभा असशील.इतके नक्की.
अवघ्या ८ वर्षाच्या वयात माझ्या या पत्राचा तंतोतंत अर्थ गवसणे तुला नक्कीच कठीण. म्हणूनच माझ्याकडून आजच्यादिवशी तुला आजन्म उपयुक्त अशी पत्ररुपी "व्रतबंध" भेट.
तुझेच बाबा श्री.श्रीपाद कृ. तारे
Late post:18/02/2018
✍️Suwarna

No comments:
Post a Comment