मी जरी हसून आता बोलतो आहे ऋतुंशी
ऐन तारुण्यात माझा चेहरा गंभीर होता.
माझ्या लहान पणची गोष्ट आहे मी साधारणतः ७-८ वर्षांची असताना एकदा आजी कडचा जुना फोटो अल्बम बघत होती.त्यात आजोबांचे तरुणपणी चे ही काही फोटोज् होते.ते पाहून मी आईला विचारले - आई,आजोबा एकही फोटोत हसत का नाही? त्यावर आई म्हणालीहे सर्व आजोबांचे महत्त्वाच्या कामाचे फोटोज् आहेत.आजोबांना कामानिमित्त सतत बाहेर राहावं लागतं,त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आहेत,आणि कामाच्या वेळेस असं कुणी उगाच हसत का?
जबाबदाऱ्या म्हणजे काय ग?
माझा पुढचा प्रश्न तयार होता.त्यावर आई म्हणाली - तुला नाही कळणार सध्या.मोठी हो म्हणजे कळेल आपोआप.आज जेंव्हा समजायला लागले तेंव्हा ह्या प्रसंगाची आठवण झाली व कवी सुरेश भटांच्या कवितेच्या ओळी स्मारल्या,त्यातला भावार्थ व आईच्या बोलण्याचा अर्थ अगदी सहज कळून आला.
मी लहान असताना आम्ही सर्व भावंड, मामा मामी,मावशी काका उन्हाळ्याच्या ह्याच दिवसात नृसिंह जयंती निमित्त अचलपूर च्या वाड्यात एकत्र जमायचो आणि परतवाडा येथे माझे घर असल्याने एरव्ही कधी मुक्कामाने नाही जमले तरी जयंतीच्या निमित्ताने दोन दिवस आधी मात्र आई,सुमेध आणि मी मुक्कामाने जायचो.बाबा आम्हाला सोडून घरी वापस येत पण सकाळी तेही लवकरच वाड्यात येत.सर्वांसोबत त्यांनाही फार आवडायचे. सगळे जमले की संपूर्ण वाडा दणाणून जायचा.आम्हा मुलांचाही फार कल्ला असायचा. आम्ही कुणालाही ऐकत नासायचो पण मात्र दादा आजोबांना नाव सांगते म्हणलं की चूप बसायचो.आजोबांनी जर का रागावले तर आम्ही आईच्या पदराआड जाऊन लपयचो.आम्हाला आजोबांचा फार धाक होता.त्यांच्याशी बोलायची पण भीती वाटायची.याउलट आजीची मात्र कधीच भीती वाटली नाही.कारण आजीचा चेहरा नेहमी हसरा असायचा. कुठल्याही व्यक्तीला आजीकडे बघून प्रसन्न वाटेल असेच तिचे व्यक्तिमत्व आहे.
आजोबा रागावतील म्हणून आम्ही आजोबांजवळ जात नसू
पण शेवटी ते आजोबांचं नातवांना रागावणं कुठल्या आजोबांना आवडेल? ते म्हणायचे ही हे पोरं बिलकुल माझ्याकडे येत नाही, त्यांना फक्त आजीच आवडते.
वास्तविक आम्हाला दोघंही फार आवडत.आजी प्रेमळ तर आजोबा ध्येयनिष्ठ, तत्वनिष्ठ.आजोबांचे जर बारकाईने निरीक्षण केले तर त्यांच्या दैनंदिनी ला एक प्रकारची शिस्त होती येवढेच नव्हे तर वेळ किती मौल्यवान आहे हे त्यांच्या दैनंदिनी तून प्रकर्षाने जाणवत.कारण ते सतत कामात असायचे.स्वतःच्या संघर्षातून केलेले त्यांचे कार्य आज मूर्त रुपात सर्वांसमोर उभेच आहे.परंतु अमूर्त कार्य म्हणजे त्यांचे घरी सुद्धा व्यस्त असलेले जीवन.एखादा दिवस त्यांना संपूर्ण घरी भेटला तरी ते गप्पा गोष्टी करत न बसता फावल्या वेळात देखील पुस्तक हातात घेऊन वाचन करत.आंघोळीनंतर नित्यनेमाने पूजा,जप हे सर्व त्यांचं ठरलेलं असतं.मग दिवस व्यस्त असो की मोकळा देवापुढे क्षणभर तरी नतमस्तक झाल्याशिवाय ते त्यांचे पुढील कुठलेच काम करत नसत.
सनावरानिमित्त्या अनेकवेळा वाड्यात आम्ही सर्व नातलग एकत्र यायचो.घरात सर्व मंडळी जमली की अनेक गमती जमती नकला व्हायच्या.अजोबसुद्धा अधेमधे एखादी चक्कर टाकत.कारण सगळे आले की त्यांना फार आनंद होत. गोतावळा त्यांना फार आवडत.आजोबांनी चक्कर टाकली की घरचे मोठे देखील शांत होत.मध्येच कुणी त्यांना विचारात दादा तुम्हाला भूक लागली का?काही हवं का? पण मानेनेच नकार देऊन ते तिथून निघून जात, तेंव्हा मला वाटायचे की कदाचित त्यांनाही गमतीजमती ऐकायच्या असतील म्हणूनच ते इथे आले असावे पण त्यांच्या येण्याने गमती च थांबल्या म्हणून ते निघून गेले.म्हणजे घरातील मोठेही त्यांना घाबरतात.म्हणून मी आजीला विचारले की आजी, सगळे आजोबांना भितात तुला नाही का त्यांची भीती वाटत? तेंव्हा आजी म्हणायची आजोबांना भ्यायला काय ते वाघ सिंह आहेत? आणि बेटा अग त्यांना कुणी भित नाही तर ते घरात सर्वात मोठे आहे की नाही त्यामुळे त्यांच्यासमोर असे मोठमोठ्याने हसणे,गम्मत करणे बरे दिसतं का?नाही न म्हणून सगळे शांत राहतात. तू जी भीती म्हणत आहे न, ती भीती नसून धाक आहे त्यांचा हा धाक आदरापोटी असतो. सगळे एकत्र आले न की त्यांनाही फार आनंद होतो.मला जसा तुमचा नातवंडांच्या लाड येतो की नाही तसा त्यांनाही येतो पण ते तेवढा व्यक्त करू शकत नाही ते वरवर जरी कडक दिसत असले ना तरी मनातून तेवढेच हळवे आहेत आणि त्यांचा हा स्वभाव मला माहित असल्याने मला त्यांची भीती नाही तर आदरच वाटतो आणि अभिमान सुद्धा.
आजी हे तुला त्यांनी कधी सांगितलं? माझा बालिश प्रतिप्रश्न तयार. त्यावर आजी हसून म्हणाली - अग आपल्या लोकांना आपण निरिक्षणातून कृतीतून समजून घ्यावं लागतं.प्रत्येक गोष्ट अशी कुणी बोलून थोडीच दाखवत. त्यादिवशी पासून माझे विचार चक्र सुरू झाले ,मलाही आजोबांना समजून घ्यायचं होतं.त्यामुळे मी अचलपूर ल गेली की आजीला वाघ सिंह,राजा राणी क्या गोष्टी सोडून आजोबंनबद्दल संग म्हणायची आणि आजीही अगदी आनंदानी आणि कौतुकाने मला त्यांच्या गोष्टी सांगायची व अनुभवातून कसे शिकायचे याबद्दल ही ती बोलत.
आजीच्या गोष्टी ऐकून मनातली सर्व प्रश्नावली मी आईसमोर मांडत.उत्तर मिळाल्याशिवाय काही माझे समाधान होत नसत.अशाच गोष्टी,गमतीजमती ऐकत मी हळुहळू मोठी होऊ लागली.आता जवळ जवळ सर्व गोष्टी ऐकून झाल्या होत्या. आजोबांनी कशाप्रकारे संस्था उभारल्या?त्यासाठी त्यांना कोणकोणत्या दिव्यातून जावे लागले?कशाप्रकारे अनेक संकटांचा सामना करावा लागला? हे सर्व सांगत असताना कधी कधी आईच्या डोळ्यातून पाणी येत.लगेच ती डोळे पुसून म्हणायची - बेटा तुझ्या आजोबंमध्ये फार हिम्मत आहे कारण ते नेहमी खरं बोलतात.परखडपणे आपले मत मांडतात आणि ते नेहमी आपल्या तत्वांशी प्रामाणिक राहतात.त्यांना ह्या प्रवासात अनेक लोकांनी मदत केली.ते सर्व आजोबा जाणतात. म्हणून अशा सर्व लोकांना ते धरून आहेत.माणूस जोडणं ही सुद्धा एकप्रकारची कला आहे.ती तुझ्या आजोबांच्या अंगी आहे. तुला एक सांगते कुठलीही गोष्ट ही तोडण सोपी असते जोडण कठीण. हळूहळू आजोबांचे जीवन नकळतपणे आदर्श वाटू लागले.आणि मला त्यांचा विषयी वाटणारा धाक हा प्रचंड आदरात बदलला होता.आणि एक गोष्ट अगदी ठामपणे कळली होती की कुठलीही अपेक्षा न करता आजोबा नेहमी जीवनप्रवास मार्ग काढत असायचे काते बाजूला करून आणि फुलं वेचून -
सूर मागू तुला मी कसा?
जीवन तू कसा मी असा.
दुःख माझा तुझा आरसा.
जीवना तू कसा मी असा.
एकदाही मनासारखा,
तू न झालास माझा सखा.
खेळलो खेळ झाला जसा.
जीवना तू कसा मी असा.
आजोबांना ऐकुन मी माझ्या परीने समजले होते पण आता अनुभवात न समजणे सुरू झाले होते.
आजोबांना मी कधीही पुजेशिवय म्हणजे संध्या, जप केल्याशिवाय घराबाहेर पडताना पाहिले नव्हते.
जो माणूस विद्वान असतो,कर्तबगार असतो तो सहसा देव मानीत नाही.मग आजोबांची देवावर इतकी श्रद्धा का?
पण आता अशा अनेक प्रश्नांची उत्तरे माझी मलाच शोधायची होती.
तेंव्हाच कळून आले की कदाचित चांगल्या कामांच्या आधी आजोबा देवापुढे नतमस्तक होऊन ते आपली आत्मिक शक्तीच वाढवतात.त्यांच्या ठाई असलेली हिम्मत,वाचा,सद्गुणांची पुंजी जपण्यासाठी ते एका दिव्याशक्तीपुढे नतमस्तक होतात.
आजोबा ज्याप्रमाणे धार्मिक गोष्टी चुकत नसे त्याप्रमाणे मागे कितीही व्याप असला तरी कुटुंबाकडे त्यांनी कधीही दुर्लक्ष केले नाही.घरात कुणाला साधा तापही आला तरी आजोबा सर्वात पहिले दवाखान्यात हजार होत,पूर्ण लक्ष घालून डॉक्टरांशी बोलून पूर्ण उपचार होईपर्यंत हलतही नव्हते. आज वयाच्या ८१ व्य वर्षी आजोबा त्याच ताठस्थ भूमिकेत असतात.आम्हा तरुण मुलांना एव्हाना त्यांच्याच नातवंडांना लाजवेल इतकी उमेद त्यांच्यात आजही आहे.त्यांच्या या स्वभावामुळे मला एक मामा आणि एक मावशी नसून मी नेहमी ९ मामा आणि ६ मावशा मोजायची.हळूहळू या संख्येत भर पडतच गेली.आजोबांचे कुटुंब कधीच मर्यादित नव्हते.असे असूनही आजोबांनी शिक्षणाचा मार्ग नेहमीच मोकळा ठेवला.
रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा
गुंतूनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा
आजोबांच्या कुटुंबाचा विस्तार हा त्यांच्या ब्लड रिलेशन पुरता मर्यादित नव्हता तर त्यांचे दुसरे कुटुंब होते ते त्यांच्या संस्थेतील सर्व सदस्यांचे.त्यांच्या सुख दुःख प्रसंगी आजोबा स्वतःच्या तब्बेतीची चिंता न करता प्रत्येक वेळेस उपस्थित राहायचे फोन करून अभिनंदन करणे किंवा सांत्वन करणे त्यांना कधीच जमले नाही कारण ते नेहमी त्यांच्या सुखदुःखाच्या सहभागी होते. वैयक्तिक कारणे देऊन पळवाटा काढणाऱ्यांच्या जगात आजोबा रमत नाही कारण-
भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले
येवढे मी भोगले की मज हसावे लागले
ठेवले आजन्म डोळे अपुले मी कोरडे
पण दुजांच्या आसवांनी मज भिजावे लागले
अनेकदा आजोबा कामानिमित्त नागपुरात आले की मी त्यांच्या सोबत सगळीकडे जायची किंवा कधी कधी त्यांच्या सोबत नागपूर परतवाडा प्रवास देखील व्हायचा.
प्रवासात आजोबा मला अनेक गोष्टी सांगायचे.त्यांच्या विषयात कधी विनोबा,सांने गुरुजी तर कधी महात्मा फुले आंबेडकर असायचे.कधी साहित्य,काव्य तर कधी नाट्य असायचे.कधी क्रिकेट तर कधी राजकारण,कधी भाषा तर कधी विज्ञान,कधी शिक्षण तर कधी शेती हे विषय असायचे.आजोबांच्या वाचनाला मर्यादा नव्हती आणि त्यामुळे ज्ञानालही मर्यादा नव्हती.आजोबंसोबतचे हे सर्व प्रवास माझ्या मनाला नेहमीच आनंद द्यायचे.आजोबा नेहमीच म्हणत कुठलाही धर्मग्रंथ किंवा पुस्तक कधीच नसते.ते ज्ञानाचे साधन आहे.आपण त्याच्याशी कसे जुळतो यावर आपले विचार ठरतात आणि मग आपण निरनिराळ्या जाती धर्म आणि पंथात विभागल्या जातो.
आजोबा आणि राम आजोबा शेवाळकर या दोघांकडे बघतांना मी नेहमी मित्र म्हणून बघायची.मैत्रीचे नाते खर तर थट्टा मस्करीचे असते.पण दादा आजोबा केंव्हाही राम आजोबंबद्दल बोलायचे तेंव्हा त्यांच्या बोलण्यात मला नेहमीच एक आदर जाणवायचा, प्रेम जाणवायचे.मैत्रीचे अनोखे भाव मी त्यांच्याकडूनच शिकली.आज मैत्री जिथे व्यवहारिक रुपात पाहायला मिळते त्या युगात मित्राची ओढ आजोबंमधे मी नेहमीच बघायची.कित्येकदा आजोबा नागपूरला आले की माझ्याही आधी राम आजोबांना भेटायला जात असत.
आजोबांनी मैत्रीचे नाते केले, जपले आणि जगले सुद्धा.
काही मित्र आजोबांना संस्थेनिमित्त भेटले पण त्यांच्याशी त्यांचे भावनिक नाते जुळले आहे. कवी सुरेश भटांच्या ज्या काव्य पंक्ती या लेखात घेतल्या त्याही आजोबांकडून त्यांच्या मैत्रीचे प्रसंग ऐकुन. त्यांच्या काव्य संग्रहाचे वाचन केले आणि त्यांच्या कवितेच्या ओतप्रोत भावनेत भिजली जसे -
जन्मभर अश्रुस माझ्या शिकविले ना ना बहाणे
सोंग पण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही
कैकदा कैफात माझ्या मी विजांचे घोट प्यालो पण प्रकाशाला तरीही हाय मी पटलोच नाही
स्मारतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे
येवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही.
आजोबांच्या सामाजिक आणि कौटुंबिक वाटचालीत आजोबा व सर्व कुटुंबीयांना अनेक अघटीत प्रसंगांना तोंड द्यावे लागले व कुटुंब प्रमुख म्हणून पुन्हा हिमतीने आजोबांना पाठीशी उभे राहावे लागले.
दुभंगून जाता जाता मी अभंग झालो
चिरा चिरा जुळल्या माझ्या आत दंग झालो
आता मजेने बोलतो भेटेल त्या दुःखा सवे
संभाळूनी घेती मला माझी इमानी आसवे
अतिशय गरीब परिस्थितीतून स्वतःच्या परिश्रमातून आणि ज्ञान साधनेतून समोर आलेल्या माझ्या आजोबांना कर्तव्याकडे पाठ वळऊन आणि जबाबदाऱ्या झटकून प्रसिद्धीचा मोह कधीही का आला नसेल? या प्रश्नाचे उत्तर शोधताना जाणवले की त्यांच्या वाटचालीत सर्वप्रथम शोध होता तो त्यांच्या अस्तित्वाचा.
किरण एक धरणी हाती मी पुढे निघालो
अन् तसाच वांवंतांना मी मला मिळाला
वारसा हक्काने चालत येणारी सतगुनांची पूंजी
आम्हाला त्यांच्या अस्तित्वाच्या शोध प्रवासातून त्यांचे तत्व आणि जीवन मूल्यांच्या रुपात भेटली, तिची जपणूक आणि वाढ करण्यासाठी ही पूंजी मी आजोबांना त्यांच्या सहस्र चंद्रदर्शन सोहळ्या निमित्त आशीर्वादाचा रूपाने आम्हा सर्व नातवंडांकरिता मागते आणि आपल्यातली पुढे चालत राहण्याची व आयुष्याच्या प्रवासात न थांबता न डगमगता नवीन आशेने पुन्हा उठून उभे राहण्याची उमेद मागते
आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सुर्य अंधाराच्या वाहतो पखाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली.
✍️Suwarna
Late Post:
१३/०५/२०१३